लिनेस क्लब खामगांव द्वारा वरिष्ठ महिलांची आरोग्य तपासणी व भजन संध्या स्पर्धा संप्पन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- दि.१० फेब्रुवारी रोजी स्थानिक सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात लिनेस क्लब द्वारा वरिष्ठ महीलांच्या हाडांची ठिसूळता व हाडांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले यावेळी डॉ. आषिशजी व्यास यांनी मार्गदर्शन केले. श्री राजेन्द्र नाहर,विनार मेडिकल यांच्या माध्यमतुन कंबर गुडघ्याच्या दुखण्यासाठी औषधी व कैल्शियम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
नंतर वरिष्ठ महिलांची भजन स्पर्धा घेण्यात आली व विजेत्याना योग्य बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.क्लब द्वारा मां से बेटी सवाई या कार्यक्रमाअंतर्गत मुलींचा सत्कार करण्यात आला उम्र का एक पडाव या विषयास अनुसरुन सौ.विद्याताई देशमुख यानी प्रेरणात्मक मार्गदर्शन केले. नंतर वरिष्ठांसोबात वसंत फाग उत्सव निमित्त लि.जया चांडक कृष्ण व लि.पूजा चांडक राधा बनल्या आणि सर्वा सोबत फुलांची होळी खेळण्यात आली. याकरिता लीनेसच्या पूर्व मल्टिपल अध्यक्षा लि. निर्मलाजी जैन, श्रीमती प्रेमादेवी केला, सौ.मोनाली सरोदे,चम्पाबाई पनपालिया,प्रेसिडेंट उर्मिला केला, सेक्रेटरी जया चांडक, कोषाध्यक्ष निशा चांडक ,लि.सुनीता राठी,सीमा चोपडा,माधुरी कमानी,झिने मैडम,राधा भैया,पूजा अवचार, शकुंतला राठी, कृष्णा राठी सह क्लब सदस्यांची उपस्थिति होती लि. निर्मला चांडक यांनी प्रोजेक्ट चेयरमैन म्हणून काम केले
إرسال تعليق