नवसाला नवदुर्गा पावली... खामगाव जिल्हा होण्याच्या मार्गावर!

आ. आकाशदादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश!!

 आता पुढे MH 28 नव्हे 

         तर MH 56.

खामगाव नितेश मानकर:- शहरासह तालुक्यांची संख्या पाहता खामगाव येथे नवीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे नवीन कार्यालय सुरू करण्यासाठी शासनाची हिरवी झेंडी मिळाली आहे. त्यामुळे आता एम एच 28 च्या ऐवजी एम एच 56 असा नोंदणी क्रमांक खामगावला मिळाला आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या प्रयत्नांना हे यश म्हणावे लागेल असे बोलल्या जात आहे

असा आहे शासन निर्णय-👇👇👇

खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव, जि. बुलढाणा या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील, तुर्तास सदर कार्यालयासाठी विहीत मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नियमानुसार करावी.

३. सदरील नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावरः

घेण्याची पुढील कार्यवाही परिवहन आयुक्तांनी तात्काळ करावी.. ४. सदर नवनिर्मित कार्यालयासाठी १ इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे. सदर वाहन घेण्यापूर्वी वाहन आढावा समितीची मान्यता घेण्यात यावी.

५. सदर कार्यालयासाठी येणारा अंदाजित आवर्ती खर्च व अनावर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करुन देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव परिवहन आयुक्तांनी शासनास सादर करावा. तोपर्यंत सदर खर्च उपलब्ध कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावा.

शासन निर्णय क्रमांकः एमव्हीडी ०७२४/प्र.क्र.१६५/परि-४

६. खामगाव, जि. बुलढाणा येथे नवीन होणाऱ्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकरीता एमएच-५६ (MH-56) हा कार्यालय नोंदणी क्रमांक देण्यात येत आहे.

७. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव यांना सदर 'कार्यालयाचे प्रमुख' तसेच 'आहरण व संवितरण अधिकारी' म्हणून घोषित करण्यात येत असून मुंबई वित्तीय नियमावली, १९५९ व महाराष्ट्र नियम, १९६८ नियम १५ (३) मध्ये नमूद केलेल्या अधिकारांचा त्यांना वापर करता येईल.

८. मोटार वाहन कायदा व नियमातंर्गत नोंदणी प्राधिकारी, अनुज्ञप्ती प्राधिकारी तसेच महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम अंतर्गत 'कराधान प्राधिकारी' म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव, जि. बुलढाणा यांना घोषित करण्यात येत आहे.

९. सदर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याकरीता येणारा खर्च मागणी क्र.बी-३. मुख्य लेखाशिर्ष २०४१ वाहनांवरील कर (००) (००१) संचालन व प्रशासन (०२) (०१) प्रादेशिक कार्यालये, दत्तमत्त (योजनेतर) (२०४१ ००३६) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या त्या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

१०. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर खामगाव, जि. बुलढाणा येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे नवीन कार्यालय स्थापन करणेबाबत नियमानुसार पुढील सर्व कार्यवाही करुन वेळोवेळी शासनास अहवाल सादर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४१००३१९२१५४४१२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم