लॉयन्स एक्स्पो 2025 च्या माहिती पुस्तकाचे विमोचन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-लॉयन्स क्लब सर्विस ट्रस्ट व लॉयन्स क्लब खामगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान भव्य लॉयन्स एक्सपो चे आयोजन करण्यात येत आहे त्यानिमित्त काल लॉयन्स एक्सपो 2025 च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सर्विस ट्रस्टचे लॉ रमेश भुतडा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी लायन्स एक्सपो च्या कार्यालयाचे ही विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष लॉ शंकर परदेशी सचिव लॉ धनंजय तळवणकर , एक्सपो चेअर पर्सन लॉ धर्मेश शहा, एक्सप्रेस सचिव लॉ नंदकिशोर देशमुख ,एक्सपो कन्व्हेनर लॉ महेश चांडक, पूर्व प्रांतपाल लॉ डॉ अशोक बावस्कर ,माजी एक्स्पो चेअर पर्सन लॉ दिनेश गांधी. लॉ अशोक केला, लॉ डॉ परमेश्वर चव्हाण, लॉ किशोर गरड , लॉ तुषार कमानी आदी उपस्थित होते.
गुरुवार 6 मार्च ते मंगळवार 11 मार्च पर्यंत चालणाऱ्या लायन्स एक्सपो 2025 या भव्य व्यापार कृषी व्यंजन आणि मनोरंजन प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे.लॉयन्स आय हॉस्पिटल च्या मदतीसाठी आणि रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी लॉयन्स एक्सपो चे दरवर्षी लायन्स क्लब खामगाव तर्फे आयोजन करण्यात येते .
खामगाव परिसरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या एक्सपोमध्ये विविध गुणदर्शनाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे तरी खामगाव व परिसरातील नागरिकांनी या लायन्स एक्सपो मध्ये सहभाग घेऊन आनंदाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे
असे प्रसिद्धी प्रमुख लॉ डॉ परमेश्वर चव्हाण यांनी कळविले आहे
إرسال تعليق