सिहोरला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी ....

 मध्य प्रदेशातील सिहोर येथील रुद्राक्ष महोत्सवाला जाणार असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात महिला भाविक या महोत्सवासाठी जात आहे मात्र तिथे गेल्यानंतर सुविधेचा अभाव दिसून येत असल्याची ओरड आहे महिलांची व्यवस्था नसल्याने अनेकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे खामगाव जिल्हा बुलढाणा येथील एक महिला हरवल्याची बातमी जनोपचारला मिळाले आहे त्यामुळे भाविक महिलांनी सावध व सतर्क रहावे असे आव्हान करण्यात येत आहे . 


मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील सावजी लेआउट मध्ये राहणाऱ्या साठ वर्षीय रजनीताई संजय देशमुख ह्या प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवात गेल्या दरम्यान आज सकाळपासून त्यांच्या मोबाईल बंद येत असल्याने घरी चिंता पसरली आहे दरम्यान आज संध्याकाळी संजय देशमुख हे खामगाव शहर पोस्टत पत्नी हरवल्याबद्दल माहिती देण्यास आले सकाळपासून संपर्क तुटल्यामुळे संजय देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे दरम्यान सदर महिलेबाबत माहिती असल्यास त्यांनी 97 67 45 44 7 4या भ्रमणधमीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे


Post a Comment

أحدث أقدم