लिनेस क्लब खामगांव चा पदग्रहण समारोह संपन्न

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बुधवार दि.22 जानेवारी 2025 रोजी लिनेस क्लबचे वर्ष 2025 करिता अध्यक्षा म्हणून लि. उर्मिला केला,सचिव लि.जया चांडक आणि कोषाध्यक्ष लि.निशा चांडक व अन्य पदाधिकारी यांचा शपथ विधि लिनेसचे पूर्व मल्टीपल अध्यक्षा लि.निर्मला जैन यांच्या हस्ते खामगांव स्थित स्व.शंकर रावजी बोबडे सभागृह,जी.यस.कॉलेज ला पार पडला.प्रमुख वक्ता म्हणून नांदुरा चे मेडिटेशन टिचर लाइफ कोच ट्रांसफ़ॉर्मर लॉयन देवयानी नवगजे मैडम होते आणि लिनेसचे पूर्व प्रांतअध्यक्षा लि अपर्णा बावस्कर यांची विशेष उपस्थिति लाभली ।  सुरवतिलाच हल्दी कुंकुचा कार्यक्रम करून गरजुंना ब्लैंकेटचे  वाटप करण्यात आले. 

जाहिरात 

कार्यक्रमा साठी लिनेसचे पदाधिकारी व सदस्यानी अथक परिश्रम घेउन  उपस्थिति दर्शविली. नवीन अध्यक्षा लि.उर्मिला केला यांनी प्रांतचे स्लोगन सेवा से समृद्धि अंतर्गत गरजू लोकांपर्यन्त पोहचुन समृद्धि साधण्यात प्रयत्न  करू असे आपल्या भाषणात संगितले.सभेचे संचालन लि.नीलू चांडक, लि.शीतल राठी यांनी तर आभार प्रदर्शन लि.जया चांडक यानी केले ।तिळापासून  व्यंजन बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम बक्षीस लिनेस निर्मला चांडक व द्वितीय बक्षीस लिनेस रिंकू गांधी हिला मिळाले अशी माहिती लिनेस चे पी आर ओ लि. डॉ सुरेखा मेंढे व लि. मीना राठी यानी एका पत्रका द्वारे दिली .

Post a Comment

أحدث أقدم