ज्ञानगंगा नदीला मोठा पूर 

काळे गावात शिरलं पाणी., बैलगाड्यांसह घरही गेली वाहून !!



काळेगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क कडून अनिल मुंडे) 

आज संध्याकाळी सात वाजता पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्ञानगंगा नदीला मोठा पूर आला. सदृश्य ढगफुटी झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने अन्नधान्यांसह मालमत्तेचेही नुकसान झाल्याची वार्ता आहे.पिपळगाव राजा घानेगाव पोरज तादुळवाडी वळती वसाडी धानोरा वडाळी नांदुरा निमगाव डोंडवाडा नायगाव डोलारखेड आधी गावातील नागरिकांनी सतर्क रहावे कारण पुढे  केव्हाही मोठा पुर येऊ शकतो.

मुसळधार पावसामुळे सुमारे आठ ते दहा घरे वाहून गेल्याचे वृत्त असून लोकांनी आपला जीव वाचून पळ काढला. पावसामुळे महादेव सावरकर विष्णु सावरकर सोनाजी सावरकर विक्रम सिग इंगळे पुंडलीक बगाडे शेक शं फार शेक इमाम शहा गजानन बोदळे संतोष बोदळे बाजीराव खंडारे काशीनाथ बोचरे यांच बैल गादे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.

Post a Comment

أحدث أقدم