मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवस कृती आराखडा....

खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा व हिवरखेड येथील प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलद गतीने निपटारा

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मुख्यमंत्री यांचे 100 दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत आज खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा व हिवरखेड येथील प्रलंबित महसुली प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याते आला. डॉ.श्री किरण पाटील जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या संकल्पनेतून व डॉ. श्री रामेश्वर पुरी उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे पुढाकाराने तसेच सुनील पाटील तहसीलदार खामगांव यांचे मार्गदर्शनाखाली आवार महसूल मंडळातील गावांसाठी "महसूल अदालत कार्यक्रम" मौजे टेंभुर्णा येथील ग्रामपंचायतचे आवारामध्ये घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी. सोनाली भाजीभाकरे  निवासी नायब तहसीलदार खामगाव ह्या होत्या .प्रमुख उपस्थिती भारती श्रीकृष्ण मोरे व प्रमुख पाहुणे म्हणून आवार मंडळातील सर्वच गावचे महिला सरपंच हजर होत्या.तसेच पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, कोतवाल, e पिकपहाणी सहायक, शेतकरी बांधव व महसूल सहा. संदीप दाभाडे,पुरवठा विभागाचे ठाकरे , सं. गा. यो. विभागाचे  जाधव व Agristack चे कामासाठी CSC चे अक्षय टिकार व आधार लिंक साठी संदीप पायघन हे हजर होते. मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे संचालन  गोपाल घाटे ग्राम महसूल अधिकारी टेम्भूर्णा यांनी केले तर प्रस्ताविक संतोष काळवाघे मंडळ खामगाव यांनी मांडले तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी वैशाली घनोकार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी आवार मंडळातील सर्व महसूल सेवक यांनी सहकार्य केले.

राजस्व मंडळ हिवरखेड येथील महसूल अदालत पार पडली

आज श्री बिंद्राबन बाबा संस्थान येथे *राजस्व मंडळ हिवरखेड येथील महसूल अदालत पार पडली* .वि.उपविभागीय अधिकारी,वि.तहसीलदार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमासाठी श्री निखिल पाटील नायब तहसीलदार हे उपस्थीत होते.त्यांनी 100 दिवस कृति आराखडा कार्यक्रमाबाबत माहिती दिली.या अदालत मध्ये 07 महसुली प्रकरणी निपटारा करण्यात आला.25 लाभार्थी यांचे आधार अपडेशन करण्यात आले.20 लाभार्थी यांना वारस ,खरेदी,बोजा कमी करणे ई .बाबत 7/12, फेरफार व 8अ चे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालयाचे वतीने विवाह प्रमाणपत्र,जन्म प्रमाणपत्र,व म्रुत्यु प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सी एस सी केन्द्रा मार्फत 12 लाभार्थी यांना अग्रिस्टैक प्रमाणपत्र देण्यात आले.उपस्थीत शेतकरी यांच्या महसुली समस्यांचे निराकरण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी मन्डलातील सर्व तलाठी,सर्व कोतवाल,कृषी सहाय्यक,ग्रा.प.सदस्य व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थीत होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनेश शेळके,नितीन गायगोळ,आनंद वानखडे ,अजिंक्य कुलकर्णी,रामेश्वर बोंबटकार,महेंद्र खोडके ,संतोष कळसकार,विशाल कलिंकर ,पवन वेरुळकर ,धम्मा गवई यांनी विशेष परिश्रम घेतले.








Post a Comment

أحدث أقدم