झोन उज्जवलची तिसरी डीजी झोन सल्लागार बैठक संपन्न
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- दि. 26 फेब्रुवारी 2025 रोजी स्थानिक शिवांगी बेकर्स, तलाव रोड ऑडीटोरियम खामगांव येथे झोन उज्वलचे झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. उज्वल गोयनका यांच्या नेतृत्वात खामगांव येथे तिसरी डीजी झोन सल्लागार बैठक संपन्न झाली. सायंकाळी 5 वाजता मेळाव्याला सुरूवात झाली. यावेळी 12 लायन्स सदस्यांची उपस्थिती होती, ज्यांनी सामुदायिक सेवा आणि संघटनात्मक विकासासाठी आपली वचनबध्दता दर्शविली.
या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून क्षेत्र अध्यक्ष, जिल्हा जीएलटी संयुक्त समन्वयक एमजेएफ लॉ. नरेश चोपडा व क्षेत्र सचिव एमजेएफ लॉ. विरेंद्र शाह उपस्थित होते. वैश्वीक लिडरशिप टीम (जीएलटी) ने एका आकर्षक चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, ज्यामध्ये ग्लोबल लिडरशिप टीम आणि समुदायक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. हा कार्यक्रम एमओसी एमजेएफ लॉ. अभय अग्रवाल यांनी कार्यक्षमतेने आयोजीत केला. यावेळी लॉ. उज्वल गोयनका, लॉ. विरेंद्र शहा, लॉ. नरेश चोपडा, लॉ. अजय अग्रवाल, लॉ. डॉ. निशांत मुखिया, लॉ. अभय अग्रवाल, लॉ. सिध्देश्वर दाणे, लॉ. अजय छतवाणी, लॉ. सुरज बी. अग्रवाल, लॉ. आशिष मोदी, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, लॉ. देवेंद्र मुणोत आदींची उपस्थिती होती. बैठकीच्या शेवटी एमजेएफ लॉ. उज्वल गोयनका यांनी सर्व सहभागी झालेल्या सदस्यांचे आभार मानले आणि मिशन 1.5 उपक्रमाप्रती वचनबध्दता व्यक्ती केली. ज्याचा उद्देश देना ही सेवा आहे या ब्रिदवाक्याअंतर्गत 2024-25 हे प्रभावी सेवेचे वर्ष बनविणे आहे. सदर बातमी मार्केटींग कॉम्प्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
إرسال تعليق