लॉयन्स एक्स्पो २०२५ चे भूमिपूजन संपन्न

लॉयन्स क्लब खामगाव च्या वतीने ६ मार्च ते ११मार्च २०२५ दरम्यान स्थानिक कळंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंड वर होत असलेल्या लॉयन्स एक्स्पो २०२५ चा भूमिपूजन समारंभ दि २६ फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर  ला. अनिल नावंदर व  ला प्रवीण चोपडा यांचे हस्ते सपत्नीक विधीवत पार पडला .

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ला शंकर परदेशी होते तर यावेळी व्यासपीठावर ला डॉ अशोक बावस्कर, ला अनिल नावंदर, ला धर्मेश शहा, ला महेश चांडक, ला डॉ धनंजय तळवणकर , ला किशोर गरड, ला नंदकिशोर देशमुख, ला राहुल भट्टड व ला ल्यूकेश मुदलियार होते .

लॉयन्स एक्स्पो २०२५ च्या एकंदर तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला तसेच हा एक्स्पो यशस्वी करण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन करण्यात आले .आपण ही या एक्स्पो मधे विविध प्रकारे  कमर्शिअल  स्टॉल, फूड स्टॉल किंवा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन एक्स्पो चा भाग होऊ शकता .भूमिपूजन कार्यक्रमाचे संचालन डॉ परमेश्वर चव्हाण यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم