जुन्या वादातून युवकाचा मायलेकींवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यृ, दोघी गंभीर जखमी: पोलिसांची कार्य तत्परता अवघ्या ५ तासात अटक

खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क : काल रात्री खामगांव शहर एका जीवघेण्या हल्ल्याने हादरले. शहरातील शंकर नगर भागातील रहिवासी गोलू सारसर या युवकाने रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान  जुन्या वादातून  घाटे परिवारातील तीन महिलांवर म्हणजेच  आई आणि दोन मुलींवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी छाया घाटे, आई मनोरमा घाटे आणि दुसरी मुलगी हर्षा घाटे या तिघी गंभीर जखमी झाल्या. तिघींनाही परिसरातील नागरीकांना तातडीने उपचारार्थ सामान्य रूग्णालयात भरती केले. यातील छाया घाटे  हिची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे तिला अकोला येथे उपचारार्थ नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान छाया घाटे हिचा मृत्यृ झाला तर  मनोरमा घाटे आणि हर्षा घाटे यांचेवर खामगांव येथील उपसामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

जाहिरात

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आणि त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता परंतु पोलीसांनी योग्य रितीने तपास केल्याने आरोपी गोलू सारसर अवघ्या ५ तासात अटक करण्यात आली. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेमुळे शंकर नगर परिसर हादरून गेला होता. नागरीकांनी सामान्य रूग्णालयात गर्दी केली होती. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आणि त्यांच्या टिम ने दाखविलेल्या कर्तव्यतत्परने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم