"लोकतंत्र सेनानी संघाची राज्य कार्यकारिणी ची सभा शेगाव येथे संपन्न"

खामगांव -जनोपचार न्यूज नेटवर्क :-  आणिबाणीच्या काळात कारावास भोगणारे लोकतंत्र सेनानी संघाची राज्य कार्यकारिणी ची सभा लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर घोराळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय श्री संत नगरी शेगांव येथे संपन्न झाली.यावेळी लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ दिक्षित, उपाध्यक्ष रामेश्वर घोराळे,महासचिव विश्वास कुळकर्णी व प्रदिप ओगले यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर सभेत संपूर्ण राज्यातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांकडुन मागील कार्यक्रम,भेटी याचा आढावा अध्यक्षांनी घेतला.

आगामी वर्ष भरात लोकतंत्र सेनानीसंघाची भूमिका कार्यक्रम या विषयी सभेत विचार विनिमय करण्यात आला. रामेश्वर घोराळे यांनी लोकतंत्र सेनानी संघाचे ध्येय धोरणे स्पष्ट केले तर सभेचा समारोप रघुनाथ दिक्षित यांनी केला.सदर सभेस महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.सभेचे प्रास्ताविक प्रदिप ओगले सोलापूर, आभार विश्वास कुळकर्णी यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم