सौ.स्नेहताई आकाश फुंडकर यांना रोप देताना भाग्यश्रीताई मानकर

वृक्षवल्ली आम्हा सोयरे....

तीळ संक्रांतीला माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांनी दिले गुलाब व शेवंतीचे रोपटे वाण !

कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहून फुंडकर काकूंनी दिले भाग्यश्रीताईंना शुभ आशीर्वाद

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- गुलाबाचे फूल प्रेम, सौंदर्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हा जिव्हाळा कायम ठेवत माजी नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर यांनी यावर्षी तीळ संक्रांतीला वाण म्हणून गुलाब व शेवंती चे रोपटे येणाऱ्या प्रत्येक महिलाला दिले. नुसतं रोपटेच नाहीतर त्याला लागणारी कुंडी देखील भेट म्हणून देण्यात आली. अर्थात त्यांच्या या कार्याला त्यांच्या सासूबाई सौ सविता मानकर यांनी समर्थ साथ दिली. सुमारे 300 रोपांचे वितरण तीळ संक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी पोहोचविले.

 भाग्यश्री ताई मानकर या त्यांच्या प्रभागात नवनवीन उपक्रम घेत असतात रस्ता सफाई पासून ते नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे जातीने लक्ष देत असतात. प्रभागात साफसफाई झाली की नाही याकडे त्यांचे आवर्जून लक्ष असते. प्रासंगिक उपक्रम बाबत तेथील नागरिक त्यांचे कौतुक करीत असतात. यावर्षी आनंदाचे व प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाब व शेवंतीचे रोपटे त्यांनी वाटप केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.


Post a Comment

أحدث أقدم