डिजिटल मिडिया परिषदेची कार्यकारिणी जाहीर,जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आनंद गायगोळ तर निखिल देशमुख जिल्हा प्रवक्ता
खामगाव : मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मिडिया परिषदेची घाटाखालील जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे यांनी सुचवल्या नंतर प्रदेश कार्यालय मुंबईतून जाहीर करण्यात आली आहे केली.यात जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आनंद गायगोळ खामगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख सर यांचे आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, यांचे नेतृत्वात युट्युब चॅनल, पोर्टल चे संपादक व पत्रकारांना डिजिटल मिडिया परिषद च्या माध्यमातून हक्काच व्यासपिठ उपलब्ध करून दिले.घाटाखाली ओटीटीचे संपादक श्रीधर ढगे यांची नियुक्ती झाल्यानंतर खामगावसह,शेगाव, नांदुरा,मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जा तालुकानिहाय शाखा गठीत करून मजबूत संघटन उभे करण्याचे कार्य करत आहेत.राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांचे उपस्थितीत नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी आनंद गायगोळ, जिल्हा प्रवक्ता निखिल देशमुख ,जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे शेगाव , जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल निंबोळकर संग्रामपूर ,सचिव वासुदेव राजनकर जळगाव जा ,कोषाध्यक्ष विनोद खंडारे नांदुरा,सदस्य दिपक इटणारे मलकापूर लोमेश भोयर ,अनिल ठाकरे,आदीचा समावेश आहे
![]() |
जाहिरात |
.
सेलू येथील मेळाव्यास सहभागी व्हावे - प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे
मराठी पत्रकार परिषद ही आपली मातृसंस्था आहे. राज्यांतील पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करणे आपले कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील पत्रकार अडचणीत सापडतात त्या त्या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी तत्पर असतात. त्यामुळेच राज्य सरकारचे मराठी पत्रकार परिषदेवर विशेष लक्ष असते हे सर्वश्रुत आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले.
إرسال تعليق