शारंगधर बालाजी नगरीत खामगांव अर्बन को-ऑप. बँकेच्या मेहकर शाखेचा थाटात शुभारंभ

जनोपचार न्यूज नेटवर्क :- विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे शाखाविस्तार असलेल्या दि खामगांव अर्बन को-ऑप. बैंक या मल्टीस्टेट शेड्‌युल्ड बँकेच्या ३३ व्या मेहकर शाखेचा शुभारंभ दि. २५ जानेवारी २०२५ रोजी समृध्दी बिल्डींग, मैंगो हॉटेल समोर, डोणगांव रोड, मेहकर या ऐतिहासिक शारंगधर बालाजी नगरीत मा. श्री. श्रीधरराव गाडगे, प्रांत सह संघचालक, विदर्भ प्रांत रा.स्व. संघ यांच्या शुभहस्ते झाला.



सदर कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून मा. ना. श्री. प्रतापराव जाधव, केन्द्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), मा. श्री. सिध्दार्थजी खरात आमदार मेहकर विधानसभा, माजी आमदार श्री. संजयजी रायमुलकर, मा. श्री. श्यामबाबु उमाळकर संस्थापक अध्यक्ष सत्यजित परिवार मेहकर, मा. श्री. सुभाषजी मोरे-जिल्हा संघचालक बुलडाणा जिल्हा रा.स्व. संघ हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष मा.प्रा.श्री. विजयजी पुंडे हे होते. तसेच मंचावर उपाध्यक्ष मा.डॉ. श्री. सतिषजी कुळकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) मा.श्री. ज्ञानेश्वरजी जाधव विराजमान होते. मा. श्रीधरराव गाडगे यांनी उ‌द्घाटनपर बोलतांना-रा.स्व. संघाची विचाराधारा पुढे ठेवून स्व. वसंतरावजी कसबेकर यांनी पश्चिम विदर्भात नागरी सहकारी बैंकांची मुहूर्तमेढ रोवली, त्यामध्ये खामगांव अर्बन बैंक पण समाविष्ट आहे, स्व. वसंतराव कसबेकरांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी दिलेला सेवेचा दिपस्तंभ भविष्यातही दैदिप्तमान ठेवायचा आहे असा मनोदय व्यक्त केला.


मा. ना. प्रतापराव जाधव यांनी आपण खामगांव अर्बन बँक परिवाराचा घटक असल्याचे सांगत बैंकेला नविन मेहकर शाखा उदघाटनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. श्यामबाबु उमाळकर यांनी शाखा शुभारंभ प्रसंगी बोलतांना बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. मा. गो. सावजी व तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्या आठवणींना उजाळा देत ६०-७० च्या दशकातील बँकांची परिस्थिती विषद केली. नागरी सहकारी बँका यांची सर्वसामान्यांना सेवा देण्याची तत्परता पाहता बँकेच्या विषयी गौरवोद्वार काढले व नविन मेहकर शाखेला रु.१० कोटी डिपॉझीट देण्याचे आश्वासन दिले. मेहकर विधानसभेचे आमदार मा. श्री. सिध्दार्थजी खरात यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये बँकेला रा.स्व. संघाच्या शिस्तीचा पायंडा व निष्काम कर्मयोगाचे पाठबल लाभलेले असल्यामुळे अल्पावधीत बँकेची मेहकर शाखा व्यवसायात भरभराटी घेईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून बैंकेस सदैव सहकार्य करण्याची ग्वाही देत असल्याचे सांगीतले. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री श्री. रणजितजी पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देत आपण या बँकेशी बाल अवस्थेपासून जुळलेले असून मागील तीन दशकांपासून बँकेशी घनिष्ट संबंध आहे. विश्वासाच्या मजबूत पायावर उभी असलेली खामगांव अर्बन बँक ऐकमेका सहाय्य करु अवघे धरू सुपंथ या उक्तीनुसार काम करीत असल्याचे सांगीतले. मान्यवर ग्राहक तथा माऊली ग्रुपचे संचालक श्री. बर्डे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना बँकेने त्वरीत रुपये सात कोटी कर्ज मंजुर केल्याबद्दल बँकेचे आभार मानले. जानेफळचे मा. सरपंच व शेतकरी नेते श्री. गजाननतात्या कृपाल यांनी बँकेच्या कामकाजाची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे श्री. सुभाषजी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मोरे बँकेचे अध्यक्ष मा.प्रा. विजयजी पुंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बैंक ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल व बँकेच्या घोष वाक्याप्रमाणे नातं विश्वासाचं असच अतुट राहील. तसेच या वर्षात संचालक मंडळाने नियोजीत केल्यानुसार आज मेहकर शाखेचा शुभारंभ झाला असून आगामी मार्च पर्यन्त नांदुरा व जळगांव (जामोद) ह्या नविन शाखा उघडणार असल्याची माहिती दिली. या शाखा शुभारंभ कार्यक्रमास बँकेचे संचालक मा.डॉ. अनिलजी धनागरे, मा. अॅड. किरणजी मोकासदार, मा. प्रशांतजी देशपांडे, मा. डॉ. राजेशजी मुंदडा, मा. संदिपजी डोळस, मा. निरजजी आवंडेकर, मा. अमोलजी हाडे, संचालिका मा. सौ. फुलवंतीताई कोरडे, मा. सौ. कल्पनाताई उपरवट, मा. सौ. मनिषाताई माटे, व्यवस्थापन मंडळ समिती सदस्य मा. घनश्यामदासजी छांगाणी, मा. मोहनराव हसबनिस, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परागजी देशमुख, सचिव प्रमादे कस्तुरे तसेच सभासद, ग्राहक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) व आभार प्रदर्शन संचालक डॉ. राजेशजी मुंदडा यांनी केले तर सुत्रसंचलन शेखर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता शाखेचे शाखाधिकारी प्रमोद कुळकर्णी व सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم