याचिकाकर्ता वैद्यकीय परीक्षेत अपात्र.....
सीआरपीएफवर दंड लावण्याचा हायकोर्टाचा इशारा
नागपूर : याचिकाकर्त्याला वैद्यकीय परीक्षेत अपात्र केल्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय राज्य राखीव दल यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. २८ जानेवारीपर्यंत उत्तर सादर न केल्यास शिक्षात्मक दंड लावण्यात येणार असल्याचा इशाराही हायकोर्टाने केंद्रीय राज्य राखीव दल यांना दिला आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
सिद्धांत क्रांतिवीर तायडे, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. सिद्धांत यांची स्टाफ सिलेक्शन अंतर्गत केंद्रीय राज्य राखीव दलामध्ये 'जनरल ड्युटी कॉन्स्टेबल' या पदावर निवड झाली. यानंतर सिद्धांत यांची वैद्यकीय चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यांच्या उजव्या हातावर जन्मापासून डाग असल्यामुळे त्यांना वैद्यकीय परीक्षेत अपात्र करण्यात आले. त्यामुळे त्यांनी हायकोर्टात या बाबीला याचिकेद्वारे आव्हान दिले. हायकोर्टाने केंद्रीय राज्य राखीव दल यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.राखीव दलाने उत्तर दिले नाही. त्यांच्यावर शिक्षात्मक दंड लावण्यात येईल, असा इशारा हायकोर्टाने दिला आहे. सिद्धांत तायडे यांच्यातर्फे अॅड. स्वप्निल वानखेडे यांनी बाजू मांडली.
إرسال تعليق