विद्यार्थ्यां चा रक्त तपासणीसाठी विद्यार्थी सेना चे निवेदन
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- शहरातील प्रत्येक शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पुर्ण शारिरीक तपासणी व मोफत रक्तगट तपासणी करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज शिवसेना विद्यार्थी सेनेच्या वतीने सामान्य रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश ठाकरे यांना देण्यात आले.
निवेदानात नमूद आहे की, खामगांव शहरातील शाळा व कॉलेजच्या मुलांना रक्तगट व शारिरीक तपासणीसाठी अतिरिक्त पैशांचा खर्च करावे लागते आणि त्यांना रूग्णालयात पूर्ण दिवस गमवावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोई होत आहे. शाळा व कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची घराची परिस्थिती हलाकीची असल्यामुळे व आपल्या शरीराकडे ना-ईलाजास्तव दुर्लक्ष करावे लागते.
आपल्या रूग्णालयात किंवा शाळा व कॉलेजमध्ये कॅम्प लाऊन विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्यात किंवा आपल्या सोयीनुसार विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करावी जेणे करून त्यांची शिक्षणाची गैरसोई होणार नाही व विद्यार्थी आपल्या जिवनात शारिरीक दृष्ट्या सदृढ राहतील. निवेदनावर विकी सारवान, धीरज कंटाळे सिद्धेश्वर निर्मळ आनंद सारसर बंटी सुकाळे गोपाल भाऊ वरणगाव, किशोर पवार अनिरुद्ध नेमाने सुनील नवले आजींची उपस्थिती होती
إرسال تعليق