शिवसेना शिंदे गट खामगाव तालुक्याची महत्वपूर्ण बैठक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या आदेशानुसार काल दिनांक २०/०१/२०२५ रोजी खामगाव तालुक्याची अत्यंत महत्त्वाची बैठक शासकीय विश्राम गृह खामगाव येथे संपन्न झाली .यामध्ये प्रामुख्याने हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनांक २३/०१/२०२५ रोजी पासुन ते ०९/०२/२०२५ शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसा पर्यंत दोन महिने जिल्हाभर वेगवेगळे ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे
यामध्ये विविध प्रकारे विविध जिल्हा परिषद सर्कल मध्ये व तालुकास्तरावर कॅम्प घेऊन विविध उपचार निशुल्क देण्यात येणार आहेत याचे नियोजना संदर्भात प्रामुख्याने विचार विनिमय करण्यात आला व तशी समिती सुद्धा गटित करण्यात आली तसेच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली,व पक्ष बांधणी संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली व सर्वांच्या अडी अडचणी त्यांच्या तोंडून ऐकून घेतल्यावर त्या शंभर टक्के सोडविण्याच्या प्रयत्न करण्यात आला
त्यामध्ये प्रामुख्याने सामान्य रुग्णालय खामगाव येथील मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत तसेच पी एस सी लाखनवाडा अटाळी येथील सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत त्यामध्ये पेशंट रेफर करणे असो किंवा डॉक्टरांचा निसकाळजी पणा असो व मोठ्या प्रमाणात डॉक्टर रात्री किंवा दिवसा सुद्धा गैरहजर असणे असो,या संविधान अडचणी राजभाऊ भोर यांना सांगून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला व येत्या काळात केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब प्रत्यक्षरीत्या सर्व पी.एस.सी.तथा सर्व सन्मान रुग्णालय यांना भेट देऊन कामात निसकाळजी पणा करणाऱ्या डॉक्टर वरती कडक कारवाई करणार आहेत,तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने काही नवीन नियुक्ती देण्यात आल्या त्यामध्ये उपतालुकाप्रमुख म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हिवरखेड येथील सदन शेतकरी मंगेश भाऊ काळे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच युवा तळून तडफदार नेतृत्व निरोड घारोळ येथील निलेश भाऊ इंगळे यांची सुद्धा उपतालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
,यावेळीप्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे आयुष्य व आरोग्य विभागाचे स्विय सहाय्यक राजु भौर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे हे होते यावेळी उपस्थित शिवसेना शहरप्रमुख मा.श्री चेतन ठोंबरे,युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकार,किसान सेना तालुका प्रमुख सुभाष पाटील वाकुडकर, अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत मदत कक्ष जिल्हाप्रमुख धीरज कंठाळे,युवा सेना उपजिल्हाप्रमुख निलेश देवताडू,वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख सागर राऊत,महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी ताई वाघमारे,महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्री ताई देशमुख,शहर प्रमुख वैशाली ताई घोरपडे, उपशहर प्रमुख पौर्णिमा ताई जाधव,युती शहरप्रमुख रेणुका ताई जाधव, महिला आघाडी च्या प्रियंका ताई शुभम बराटे,महिला आघाडी उप तालुका प्रमुखसुवर्णाताई अरुण वानखेडे,संध्या ताई भगवान काळबागे,महिला आघाडी उपतालुका प्रमुख ज्योतीताई भगवान बुजाडे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख .आनंद सारसर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात,शिव वाहतूक सेना तालुका संघटक सिद्धेश्वर निर्मळमा, डॉक्टर वर्धन तायडे, डॉक्टर रावणकर, आशिष ठाकरे,शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष सातव,शिवसेना उपतालुका प्रमुख गजानन हुरसाळ,शिवसेना उपतालुका प्रमुख विष्णू कदम, विलास बापू देशमुख, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील,शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष दुतोंडे,शिवसेना उपतालुका प्रमुख बाळासाहेब पेसोडे,शिवसेना उपतालुका प्रमुख शिवशंकर सरोदे,शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काळे,शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश इंगळे,शिवसेना उपतालुका प्रमुख भास्कर कवळकार, ,यासह शिवसेना अंगीकृत सर्व संघटनातील पदाधिकारी तथा शाखाप्रमुख बुथ प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .*
إرسال تعليق