प पु काका महाराजांनी काही उद्देशानेच वारी सुरू केली होती -अजय ताम्हण

खामगाव-कारंजा लाड पायदळ वारी :भक्तिमय वातावरणात


खामगाव- जनोपचार न्यूज नेटवर्क :- प. पु. काका महाराजांनी पायदळ वारी ही काहीतरी उद्देशानेच सुरू केली होती. याचा प्रत्यय वारी सुरू केल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळ्या स्वरूपात येत गेला.असे आपल्या प्रबोधनातून अजय दादा तामण यांनी  सांगितले.श्री नारायण महाराज संस्थान  वाडेगाव येथे सायंकाळी त्रिपदी नंतर  ते प्रबोधन करीत होते.

प पु नाना-काका  महाराजांच्या आशीर्वादाने  दिनांक 23  रोजी पहाटे 5.30 वाजता बरसाना आणि प पु काकांच्या वास्तव्य स्थानापासून  श्री दत्त आणि प पु नाना-काकांच्या जयघोषात  सुरू झालेल्या पायदळ वारीचे  समापन दिनांक 26 जानेवारी रविवारी श्री गुरू मंदिर कारंजा लाड येथे भक्तिमय वातावरणात  करण्यात आले. 

  दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... नाना काका कृपा करा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या....नाम घोष आणि जयकाऱ्याने पालखीमध्ये सहभागी सर्व भक्त आपले देहभान विसरून सहभागी झाले होते पालखी दरम्यान पहिला मुक्काम वाडेगाव येथे तर दुसरा मुक्काम दोनद आणि तिसरा मुक्काम वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज संस्थान पोहा येथे झाला. आपल्या प्रबोधनात पुढे बोलताना अजय तामण यांनी वारीमध्ये चालत असताना नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे यानुसार भक्तांनी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून वारीमध्ये चालत राहावे वारीमध्ये चालत असताना आपल्याला थोडाफार शारीरिक त्रास होऊ शकतो परंतु याची काळजी न करता जसे विठोबाला आपण माऊली आपली माय म्हणतो त्यानुसार आपली सद्गुरु माऊली आपल्या रक्षण करीत असते यासह त्यांनी गुरुकृपेचा महिमा विशद केला. परम पूजनीय काकांना सुद्धा अभिप्रेत असलेली सेवा आणि शिस्त पालखी दरम्यान सर्वांनी पाळली होती तर वारीमध्ये शेकडो युवक आणि भक्त सर्वांना आकर्षित करीत होते.

यावर्षीच्या पालखीदरम्यान खामगाव,जळगाव जामोद, मलकापूर, शेलापूर, विहिगाव सह पुणे, मुंबई येथून काका महाराज परिवारातील श्रद्धाळू सहभागी झाले होते.  त्यांनी सुद्धा या वारीचा आध्यात्मिक आनंद घेतला. अशी माहिती श्रीकांत भुसारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم