आदर्श ज्ञानपीठ येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात संपन्न
खामगांव - जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातिला राष्टीय ध्वज उंच फडकवून, तिरंग्याला सलामी व राष्ट्रागीत म्हणण्यात आले. कार्यक्रमाच्या अधक्ष्या सौ रजनीताई मोहता यांच्या हस्ते राष्टीय ध्वज फडकविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलाने तसेच माता सरस्वती व स्व. विजयाबाई राजपूत यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साही वातावरणात प्रजासत्ताक दिन चिरायू हो, भारत माता की जय अश्या घोषणा देत सर्व वातावरण देशभक्तिमय केलेले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे दिली तसेच देशभक्तीवर आधारित नृत्याचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शाळेचे संस्थापक अध्यक्ष कन्हैयासिंह राजपूत हे होते तसेच गणेश म्हात्रे, जितेंद्र जैन, कृष्णा राठी, कविश्वरसिंह राजपूत यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता पळसकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षरा इरतकर यांनी केले तर आभारप्रदर्शन नम्रता देशमुख यांनी केले. कार्यक्रमानंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी तयार केलेली विविध सुंदर कलाकृती, बोर्ड तसेच प्रोजेक्ट आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतर्फे उपस्थित पालकांना तसेच मान्यवरांना दाखविण्यात आले.
कार्यक्रमच्या यशस्वी ते करीता आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका सौ ममता महाजन, पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत, सौ ज्योती वैराळे, कु माधुरी उगले, सौ कल्पना कस्तुरे, सौ अलका वेरूळकर, सौ प्रिया देशमुख, सौ सारिका सरदेशमुख, कु दामिनी चोपडे, सौ अक्षरा इरतकर, सौ प्रियंका वाडेकर, सौ अर्चना लाहूडकर, कु मिनल लांजूडकर, सौ नम्रता देशमुख, श्रीमती स्वाती निंबोकार, सौ कोमल आकणकर, सौ अश्विनी वकटे, श्रीमती सपना हजारे, सौ संगीता पिवळटकर, सौ वंदना गावंडे, सौ सुवर्णा वडोदे, सौ प्रतिभा गावंडे, सौ राजकन्या वडोदे, सौ मीरा कांदिलकर आदींनी प्रयत्न केले.
إرسال تعليق