ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- ब्राईट फ्युचर कॉन्व्हेंट महात्मा ज्योतिबा फुले नगर परिषद शाळा क्रमांक 12 मध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी खामगाव नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी .आनंद देवकते,नगर अभियंता प्रभाकर लबडे, उपअभियंता.राजेंद्र महस्के,खामगाव पंचायत समितीचे माजी बिडिओ भास्करराव चरखे, माजी नगरसेवक विजय उगले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेच्या सहाय्यक ग्रंथपाल हर्षाली खंडागळे, संस्थेचे संचालक सेवानिवृत्त मुख्याध्यापक वामनराव हजारे ,संस्थेचे उपाध्यक्ष योगेश भाऊ हजारे यांची यावेळी उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार श्री. योगेशभाऊ हजारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या प्राचार्य शरयू कुलकर्णी तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका पूनम पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य करून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना बक्षिसे दिले. यावेळी शाळेचे विद्यार्थी, पालक वर्ग,मान्यवर पंचक्रोशीतील नागरिक, क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेचे विद्यार्थी मित्र यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
إرسال تعليق