शेगाव प्रतिनिधी - येथील विश्राम भवन मध्ये १४ जानेवारी रोजी व्हॉईस ऑफ मीडियाची बैठक ज्येष्ठ पत्रकार संजय सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.याप्रसंगी प्रदेश कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ, कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे, जिल्हा प्रवक्ता फहीम देशमुख, भाऊ भोजने, जिल्हा उपाध्यक्ष किशोरआप्पा भोसले, नितीन कानडजे, संभाजी टाले, यांची प्रमूख उपस्थीती होती.
व्हाईस ऑफ मीडियाच्या ध्येय धोरणांबद्दल माहिती देऊन पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया असल्याचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी सांगितले. त्यानंतर व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा संघटकपदी पत्रकार अमर बोरसे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी जाहीर केली. त्यानंतर शेगाव तालुकाध्यक्षपदी नानाराव पाटील, तालुका सचिव ज्ञानेश्वर ताकोते, शहराध्यक्ष दिनेश महाजन, डिजिटल विंग तालुकाध्यक्ष समीर देशमुख, तालुका कार्याध्यक्ष महेंद्र मिश्रा, तालुका उपाध्यक्ष सतीश अग्रवाल यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रकाश उन्हाळे, दिनेश घाटोळ, विवेक शेगावकर, राजवर्धन शेगोकार, संजय ठाकूर, विजय खंडेराव, सुधाकर बावस्कार, गोपाल हिंगणे, बाबुराव वानखडे, मंगेश सुधाकर ढोले,राहुल रिंढे, मंगेश तायडे आदी सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक नाना पाटील यांनी तर संचालन रोहित देशमुख तर आभार समीर देशमुख यांनी केले
إرسال تعليق