शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे पोहोचले शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन महावितरण कार्यालयत : कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्याला मिळते रात्री एक वाजेपासून वीज

तुम्हीच सांगा विज वितरण अधिकारी माय बाप शेतकऱ्यांनी रात्री एक वाजेला लाईट आल्यानंतर कशी शेती करावी त्यामध्ये दिवसालाच सर्व ट्रांसफार्मर ओव्हरलोड असल्यामुळे लाईन टिकत नाही आणि दिवसालाच कर्मचारी अधिकारी हजर नसतो तर रात्रीला कधी येईल त्यातच रात्री शेतीला कसे पाणी द्यायचे आणि स्प्रिंकलर कसे बदलावे लाईनमन दिवसा कामे करत नाही तर रात्री कसे करणार अजप महावितरणची गजब कहानी,आता कांदा लागवडीचे लगबग चालू झाली असल्यामुळे दिवसाला लाईट देणे अत्यंत आवश्यक आहे कारण रात्रीला कुठल्याही प्रकारची कांदा लागवड होऊ शकत नाही, कारण लागवड या महिला करतात रात्रीला कसं शक्य आहे या सह काही अडचणी घेऊन महावितरण उपअभियंता बाहेकर साहेब यांची भेट घेण्यात आली, सविस्तर चर्चा करून त्यांना विनंती करण्यात आली की कांदा लागवडीचे दिवस असल्यामुळे तसेच कडाक्याची थंडी असल्यामुळे शेतकऱ्याला दिवसा लाईट देण्यात यावी त्याचबरोबर जिथे ओढलोट ट्रांसफार्मर आहेत,त्याकरिता केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब यांचे नवीन ॲडिशनल नवीन डीपी सह ट्रांसफार्मर मंजूर करण्याकरिता पत्र देण्यात आले व लवकरात लवकर सर्वे करून इस्टिमेट सादर करावे लवकरात लवकर डीपी मंजूर करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे वारंवार आम्ही आपल्याकडे शेतकऱ्याचे समस्या घेऊन येतो परंतु आमची सुद्धा जबाबदारी असल्यामुळे जिथे अत्यंत आवश्यक आहे तिथे डीपी टाकण्याचे मंत्रिमहोदयाचे पत्र आणून दिले त्यामुळे जिल्हा नियोजन मध्ये ट्रांसफार्मर मंजूर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्या सुद्धा भेटणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शहापूर शिवारातील सागर मेतकर यांची डीपी आहे,त्यानंतर हिंगणा कारेगाव पांझाडे डीपी आहे,त्यानंतर कुंभेफळ भालेगाव येथील वाडे डीपी आहेत अशा सर्व अडचणी घेऊन शेतकरी व शिवसेना पदाधिकारी शिवसेना शहर प्रमुख चेतन भाऊ ठोंबरे,किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील वाकुळकर,शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख सचिन भाऊ पवार,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख आनंद सारसर,शिवसेना उपतालुका प्रमुख सागर मेतकर, घाटपुरी शाखाप्रमुख गोपाल भाऊ चव्हाण,विभाग प्रमुख गोपाल भाऊ शेळके, डॉक्टर वर्धन तायडे,डॉक्टर रावणकार,आशिष ठाकरे,शेतकरी प्रकाश भंडारी,ज्ञानेश्वर बदरखे, समाधान गावंडे,अनिल लांडे,संतोष बदर्खे, यासह मंगेश इंगळे, बिट्टू सारसर,आदीं उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم