वाडी येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात
खामगांव :- येथून जवळ असलेल्या वाडी येथे महात्मा फुले प्राथमिक शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला शिक्षण समिती चा पदाधिकाऱ्यांनी ध्वज पूजन करून ध्वजारोहण केले, तसेच उपस्थित सर्वांनी मानवंदना दिल्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी तथा पालक वर्गांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं श्वेता पितळे यांनी तर संस्थेच्या प्राचार्य सौ छाया चौधरी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
إرسال تعليق