नवनियुक्त कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांचा बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपूर कडून भावनिक सत्कार

नागपूर येथे बुलढाणा भवन मंजूर होण्याच्या आशा पल्लवीत

बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ, नागपूर यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आमदारांचा आणि *राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. आकाशजी फुंडकर यांचा सत्कार नागपूर* येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी सत्कार स्वीकारताना *मंत्री आकाश फुंडकर म्हणाले,* "यश कधीच एका व्यक्तीचे नसते; त्यामागे आपल्या माणसांचा विश्वास, प्रेम, आणि पाठिंबा असतो. जेव्हा आपुलकीची माणसे आपल्या यशाचा आनंद हक्काने व्यक्त करतात, तेव्हा खरे समाधान मिळते. हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणेचा नवा दीप आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे."

यावेळी मान्यवरांनी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.  तसेच नागपूर येथे बुलढाणा भवन उभारण्याची मागणी देखील मांडण्यात आली.  आकाश फुंडकर यांना मंत्री पद मिळाल्यामुळे नागपूर मधील बुलढाणा जिल्हा वासियांच्या अपेक्षा वाढल्या असून ही मागणी आकशदादा पूर्ण करतील असा विश्वास आहे अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. संजय मारोडे, उपाध्यक्ष श्री. वामन शास्त्री, सचिव सौ. लीनाताई पाटील, सहसचिव श्री. अनंत भारसाकळे, कोषाध्यक्ष श्री. देवेंद्र केदार यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार मा. श्री. अजयजी संचेती, आमदार मा. श्री. चैनसुखजी संचेती, आमदार मा. श्री. संजयजी गायकवाड, आमदार मा. श्री. धीरजजी लिंगाडे,आमदार मा. श्री. मनोजजी कायंदे, आमदार मा. सिद्धार्थ खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. नाझेर काझी, श्री. राजेश राजोरे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

हा सत्कार सोहळा मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वावर आणि जनतेच्या विश्वासावर अधोरेखित करणारा क्षण ठरला. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم