परभणी येथील घटनेचा आरपीआय गवई गटाकडून निषेध
कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन- विजय बोदडे
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- परभणी येथे घडलेल्या घटनेचा खामगाव येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निषेध करण्यात आला असून तसे निवेदनही जिल्हाध्यक्ष विजय बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी बाबुराव सरदार बाबुराव सोनवणे अमित तायडे राहुल खंडारे हिम्मतराव भोजने आदींची उपस्थिती होती.
निवेदनात नमूद आहे की, पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी या शहरामध्ये जातीयवादी समाजकंटकांनी जातीयद्वेष भावनेतून डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधाच्या शिल्पाची तोडफोड केली ही गोष्ट अत्यंत लाजीरवाणी आणि निषेधार्ह आहे तसेच देशद्रोही घटना आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलीत अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही महाराष्ट्रामधील पहिलच घटना नाही. सदरचे घटनेमुळे महाराष्ट्रामध्ये विशेषतः परभणीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पोलीसांनी मुख्य आरोपींना पकडण्याचे सोडुन अनुसुचित जातीच्या लोकांना कोबिंग ऑपरेशन चालवून अनेक निरअपराधांना अटक केलेली आहे. वास्तविक पाहता प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे तसेच संविधानाची शिल्पाची तोडफोड करुन अपमान करणाऱ्यांना व सर्व हल्लेखोर समाजकंटाकांना आजपर्यंत अटक केलेली नाही. निरअपराध दलीत लोकांचे कोबिंग ऑपरेशन करून अटक करणे हे गैरकायदेशीर व निषेधार्ह आहे.
आम्ही सदरचे निवेदनाद्वारे आपणास कळवितो की, परभणी येथील अनुसुचित जातीचे दलित लोकांचे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवून निरपराधांना सोडून देण्यात यावे. ज्यांचा सदरचे प्रकरणासोबत संबंध नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये व खऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलीसांनी हत्या केली त्यावर खुनाचे गुन्हे दाखल करुन बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) बुलढाणा जिल्ह्याच्यावतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी
إرسال تعليق