अखेर बुलढाणा जिल्ह्यात कागदी व प्लास्टिक कपावर बंदी !
आझाद हिंद च्या लढ्याला मोठे यश. जनसामान्यातून कौतुकाचा वर्षाव.
![]() |
जनसामान्यांना कॅन्सर मुक्त ठेवण्यासाठी केलेल्या आझाद हिंदच्या लढ्याला यश आल्यामुळे सर्वसामान्यातून आझाद हिंदच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे. |
बुलढाणा; जनोपचार न्यूज नेटवर्क :- कागदी व प्लास्टिक कपांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारीत झाले आहे. कागदी व प्लास्टिक कपावर बंदी घालावी करिता आझाद हिंद संघटनेने दिलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे जनसामान्यातून आझाद हिंदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कागदी व प्लास्टिक कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामांक केमिकल शिवाय कप बनत नाही. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण दिल्या जात असल्याचे भारतीय वैज्ञानिकांनी जाहीर केले होते.त्यानुसार कागदी व प्लास्टिक कपावर बंदी असतानाही खुलेआम कागदी व प्लास्टिक कपांमध्ये चहा आणि इतर पेय दिल्या जात आहे. त्यामुळे आपण पैसे देऊन कॅन्सरला निमंत्रण देत आहोत. करिता बुलढाणा जिल्ह्यातील कागदी व प्लास्टिक कपावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला आंदोलन करून केली होती. सदर महत्त्वपूर्ण मागणीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने 7 नोव्हेंबर 2024 ला सर्व विभाग प्रमुखांना कावी/स्था.निधी/कक्ष/9.4/813/2024 आदेशान्वये आपल्या स्तरावरून कागदी व प्लास्टिक कपावर बंदी घालण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
إرسال تعليق