लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे दिवाळी निमित्त शहरातील छोट्या दुकानदारांना फराळाचे वाटप
खामगाव लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने जॉय ऑफ गिव्हींग अंतर्गत दिवाळी निमित्त बाहेरगांव येथुन आलेले छोटे छोटे व्यापा-यांना मिठाई व नमकीनच्या पाकीटाचे वितरण करण्यात आले. यावेळी जवळपास ५०० ते ६०० दुकानदारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या सेवा कार्यात लॉयन्स क्लब संस्कृतीचे सदस्य व पदाधिका-यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.
إرسال تعليق