मोकाट कुत्र्यांची दहशत: नागरिकांसह मुलांमध्येही घबराहट!

पालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करतील काय? 


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- मोकाट कुत्र्यच्या दहशतीमुळे वर्धन लेआउट डीपी रोड भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. लहान मुलांची ही घाबरगुंडी कुठली असून पालिका प्रशासन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करेल काय असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. 


याबाबत रहिवाशांनी सांगितलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांपासून या भागात कुत्र्यांची टोळी फिरत आहे. त्यांना थकलायचे म्हटले तर संपूर्ण टोळी चावायसाठी अंगावर धावते. वेळोवेळी पालिकेला विनंती करण्यात आली आहे मात्र कोणतीही दखल घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन महिन्यापासून वर्धन लेआउट डीपी रोड गावातील नागरिक कुत्र्यांच्या दोस्ती खाली असून मुख्याधिकारी शेळके यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم