मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त
जिल्हा व सत्र न्यायालयात न्या.सौ. माने - गाडेकर यांच्या हस्ते हिंगोली येथे ध्वजारोहण
हिंगोली-जनोपचार न्यूज नेटवर्क:-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हा व सत्र न्यायालयात ध्वजारोहणा न्यायाधीश सौ. सरोज एन. माने- गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही वर्ष निजामशाहीच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त होऊन स्वतंत्र झाला नव्हता. त्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे नेतृत्व अनेक महापुरुषांनी केले होते. 17 सप्टेंबर 1948 ला निजाम राजवटीतून मराठवाडा मुक्त झाला. याच दिवशी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन दरवर्षी मोठ्या उत्साह साजरा केला जातो. मराठवाड्याच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून या दिनाकडे पाहिले जाते. या मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सर्वत्र ध्वजारोहण केल्या जाते.
हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुद्धा ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. सरोज एन. माने- गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याला प्रथम श्रेणी, वरिष्ठ श्रेणी व जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, वकील तथा कोर्टातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق