श्री हनुमान मंडळाचा पुष्पक विमानाचा देखावा बनला आकर्षनाचे केंद्रबिंदु

मंडळाचे यंदा ७३ वे वर्ष ः क्रीडा क्षेत्रासह सामाजिक कार्यात नावलौकीक

खामगाव, जनोपचार न्यूज नेटवर्क ः संपुर्ण राज्यात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. खामगाव शहरातील ऐतिहासिक व क्रीडा क्षेत्रासह सामाजिक कार्यात नावलौकीक असलेल्या येथील सती फैल भागातील श्री हनुमान नवयुवक मंडळाच्या वतीने यंदा पुष्पक विमानाचा देखावा साकारून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. प्रभु श्रीरामचंद्र, सिता माता, प्रभु लक्ष्मण व श्री हनुमान यांच्यासोबत गणरायाची अत्यंत देखणी मुर्ती असलेला हा सुंदर व मनमोहक देखावा शहरवासियांच्या आकर्षनाचा केंद्रबिंदु बनला आहे.


मंडळ क्रीडा क्षेत्रासह सामाजिक कार्यात अग्रेसर :- मंडळाची अद्ययावत व्यायाम शाळा असून दररोज शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते या व्यायाम शाळेत कसरत करीत असतात. सोबतच मंडळाच्या वतीने बालवाडी, वाचनालय, वृक्षारोपण, गरीबांना कपडे वाटप, रोख मदत व रक्तदानाचे स्वरुपात सामाजिक कार्य केले जाते. दरवर्षी जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत कबड्डी, मल्लखांबच्या सामन्यांचे आयोजन या व्यायाम मंडळाच्या मैदानावर केले जाते. मंडळाचे ५० ते ६० कार्यकर्ते राज्य व राष्ट्रिय पातळीवर क्रीडा क्षेत्रात विविध क्रीडा प्रकारात चमकले आहेत व काही युवक आर्मी, बिएसएफ सह शासकीय नोकरीत तर काही विदेशात शिक्षणासाठी गेलेले आहेत.

खामगाव शहरातील सती फैल भागातील हनुमान नवयुवक मंडळाची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर ५ वर्षांनी सन १९५२ मध्ये झाली. यावर्षी मंडळाचे ७३ वे वर्ष असून अमृत महोत्सवाकडे मंडळाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. दरवर्षी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव जल्लोषात साजरा करून विविध समाजप्रबोधनपर देखावे, महानाट्य, लोकोपयोगी उपक्रम राबवले जाजात. गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाकडून मिरवणूक काढून चित्तथरारक प्रात्याक्षिक, साहसी खेळ खेळले जातात. यावर्षी सुध्दा हनुमान मंडळाच्या वतीने गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात असून पुष्पक विमानाचा अतिसुंदर असा मनमोहक देखावा साकारण्यात आला आहे. या पुष्पक विमानात प्रभु श्रीरामचंद्र, सिता माता, प्रभु लक्ष्मण व श्री हनुमान यांच्यासोबत गणरायाचा अत्यंत देखणी मुर्ती आहे. याच सोबत अत्यंत सुंदर मंडप परिसर, देखाव्यासमोरील पाण्याचे फवारे, हत्ती, लायटिंग, सुंदर प्रवेशव्दार यामुळे हा देखावा शहरवासीयांचे आकर्षण ठरत असून दररोज याठिकाणी भक्तांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.  

श्री हनुमान नवयुवक मंडळ क्रीडा क्षेत्रासह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहले आहे.  मंडळाचा हा नावलौकीक वाढविण्यामध्ये संपुर्ण सती फैल भागातील नागरिकांचा महत्वाचा वाटा असून  सर्वजन एकदिलाने काम करीत असतात. यावर्षी पुष्पक विमानाचा देखावा साकरण्यात आला असून दरवर्षी नवनवीन देखावे व उपक्रम राबविणे हीच मंडळाची वेगळी ओळख राहली आहे. - कृष्णा सिंग ठाकूर


-----------------------------------------------------------

Post a Comment

أحدث أقدم