हिवरखेड येथील नागरिकांच्या आमरण उपोषणाची सांगता...!!
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- रस्त्यासह विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर यशस्वी सांगता प्रहार नेते गजानन लोखंडकार यांनी यावेळी पुढाकार घेतला.
हिवरखेड येथील शेतकऱ्यांनी,गावकऱ्यांनी शेतरस्तासंदर्भात शेतरस्त्याची दुरुस्ती करुण मिळणे बाबत,पुलाचे बांधकाम करुण देण्यात यावे यासह रस्त्याच्या मागण्यासाठी हिवरखेड येथे आमरण उपोषणास प्रारंभ केला होता .या उपोषण मंडपास भेट देऊन त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून व ह्या मागण्या सोडवण्यासंदर्भात जि.प.बांधकाम अभियंता कुलकर्णी ,गट विकास अधिकारी राजपूत ,राज्य महामार्ग अधिकारी वासनिक ,कचाले यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समवेत शेत रस्त्याची पाहणी करुण त्यांचे कडून आश्वासन घेऊन उपोषणकर्त्यांचे समाधान करून हिवरखेड येथील नागरिकांचे आमरण उपोषणाची शरबत देऊन सांगता केली.
إرسال تعليق