जनोपचारच्या विशेष प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर यांचा नागपूर येथे सन्मान:
नागपूर:- पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनोपचार न्यूज नेटवर्कच्या विशेष प्रतिनिधी रत्नाताई दिक्कर यांचा नागपूर येथील रवी भवनात सन्मान करण्यात आला.दर्पण पत्रकार एवंम संपादक फाउंडेशन च्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना शाल श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये कोरोना महामारीच्या काळात जीवाची परवा न करता वाडी, वस्ती ,तांडा मध्ये जाऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्थाची हॉस्पिटल ची मदत करून त्यांचा जीव सुरक्षित ठेवणे सोबतच पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सौ रत्नाताई डिक्कर भव्य सत्कार करण्यात आला.सोबतच समाजसेवा करणाऱ्या सौ किरणताई लंगोटे सौ श्रीमती अलकाताई बांगर ,सौ परिणीती धामंदेयांचा सुद्धा सत्कार करण्यात आला .
إرسال تعليق