श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने मावळे यांचा भव्य सत्कार 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- श्री शिव छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान शिवाजीनगर खामगाव च्या वतीने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक माननीय श्री नरेंद्रजी मावळे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कार सन्मानित सोर सर हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश माने वंचित बहुजन महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनवणे शरद भाऊ वसकार साहित्यिक रामदादा मोहिते माजी जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे तानाजी व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव ओंकार आप्पा तोडकर हनुमान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी रेठेकर मा. अध्यक्ष राजपाल सिंग चव्हाण  ज्ञानदेव मानकर हे होते सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमाकांत गलांडे यांनी सांगितले की श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने अनेक सेवाभावी कार्य राबवले जातात पण सर्वात मोठे कार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीच्या वेळी दरवर्षी राज्य विदर्भ स्तरीय कबड्डी चे जबरदस्त आयोजन करून कबड्डीपटूना प्रोत्साहित करण्याचे काम तसेच कबड्डी खेळाडूचा प्रसार करण्याचे काम सातत्याने होत असते माननीय नरेंद्रजी मावळे हे प्रतिष्ठानचे पारिवार सदस्य असून कबड्डी खेळाचे ते राष्ट्रीय खेळाडू आहे . आज त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार हा त्यांचा पारिवारिक सोहळा आहे . सुरुवातीलाच प्रतिष्ठानच्यावतीने नरेंद्र मावळे यांचा भव्य सत्कार  मान्यवरांच्या तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश माने सचिव विकास चव्हाण रामभाऊ बोंद्रे रमाकांत गलांडे चंद्रकांत रोठेकर महेंद्र पाठक सुभाष शेळके नागोराव अवचार सह प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आला . नंतर गणेश भाऊ चौकसे  शरद भाऊ वसतकार

राजपाल सिंग चव्हाण यांनी नरेंद्रजी मावळे  यांच्या व्यक्तिमत्वा  बद्दल तसेच त्यांच्या उत्कृष्ट कबड्डी खेळा च्या बद्दल कौतुकास्पद उद्गार काढले तर अशोक भाऊं सोनवणे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक क्रीडा प्रतिष्ठान हे शहराचे भूषण असून कबड्डी सारख्या खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम प्रतिष्ठान च्या वतीने होत असते नरेंद् मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर उत्कृष्ट अधिकारी होते पण आता   पुढे  नव्याने नवीन खेळाडू निर्माण करण्यासाठी त्यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे तर

अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना सोर सरांनी सत्कारमूर्ती नरेंद्रजी मावळे यांच्या जीवनाविषयी अनेक पैलू सांगत विशेष सांगितले की अंबिका क्रीडा कबड्डी संघाचा एकेकाळी जबरदस्त दरारा होता त्यावेळी नरेंद्र मावळे विकास चव्हाण सारखे अनेक राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू या संघात होते सितारामजी तायडे जे छत्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहे त्यांनी हे सर्व खेळाडू घडवले नरेंद्र मावळे हे उत्कृष्ट खेळाडू तर होते तसेच शांत संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते त्यांना कधी अहंकार आला नाही ते चांगले खेळाडू त्याचप्रमाणे एक चांगले अधिकारी म्हणून कार्यरत राहिले ते अजातशत्रू त्यांचे संबंध सर्वांशी चांगले आता यापुढे त्यांनी कबड्डी खेळासाठी नवीन खेळाडू यांना मौलिक असे मार्गदर्शन करावे श्री संत गजानन महाराज यांचे कृपा त्यांच्यावर अपार राहो ही संत चरणी प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संभाजीराव टाले यांनी केले यावेळी नरेंद्रजी मावळे यांचा अनेकांनी सत्कार केला त्यात प्रामुख्याने म्हणजे अंबिका क्रीडा मंडळ पदाधिकारी सर्व खेळाडू तसेच सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळ ,श्री संत गजानन महाराज सेवाभावी ट्रस्ट, हनुमान क्रिकेट क्लब, संत गजानन महाराज सेवा प्रकल्प, मोठी देवी सेवाधारी मंडळ, जिल्हा एसटी कष्टकरी संघटना संजू भाऊ शर्मा मित्र परिवार यांच्यासह अनेक संघटना संस्था व मान्यवरांनी तसेच वैयक्तिकरित्या या ठिकाणी नरेंद्रजी मावळे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची व परिसरातील लोकांची उपस्थिती होती

Post a Comment

أحدث أقدم