बापरे... धरणावर बिबट??
खामगाव चा पाणीपुरवठा होऊ शकतो विस्कळीत?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माटरगाव धरणावर बिबट दिसून आल्याने कर्मचाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. घनदाट जंगलाच्या मध्यवर्ती भागात धरण असल्यामुळे आधीच रात्रीच्या वेळी कर्मचारी येथे जाण्यास घाबरतो त्यात जंगली प्राणी दिसून आल्यानंतर आपण समजू शकता कर्मचाऱ्यांची हालत काय होत असेल.
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार गिरी माटरगाव माटरगाव धरणावर आज रात्री नऊ वाजताच्या दरम्यान बिबट दिसून आला होता. तसेच या अगोदर मागील आठवड्यात तिथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे कर्मचारी सांगतात. त्या ठिकाणी असलेले मजूर घाबरले घाबरतात. त्यामुळे धरणावरून होणारा पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होते अशा अवस्थेत खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे चानचेस वाढले आहेत. याबाबत वनविभागाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
إرسال تعليق