प्रियजनान च्या सत्काराला भारावले हभप संजय महाराज पाचपोर!

 मराठा पाटील सेवा मंडळा च्या सत्कार सोहळ्यात स्वयंस्फूर्त उपस्थिती


खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क:-  मराठा पाटील सेवा मंडळाच्या वतीने १० सप्टेंबर रोजी घाटपुरी रोडवरील श्रीधर महाराज सेवा मंदिरात सत्कार सोहळा पार पडला. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाेबा पुरस्कारप्राप्त हभप संजय महाराज पाचपोर, श्रीराम महाराज खेडकर यांना गौरविण्यात आले.

अध्यक्षस्थानी सखारामपूर येथील श्रीसंत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज होते. शंकर महाराज जागृती आश्रम शेलोडी, हभप गोपाळराव महाराज उरळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संजय महाराज पाचपोर यांनी कथा-कीर्तनातून धर्मप्रचारासोबतच १८ हजारांपेक्षा गायींचे संगोपन, ४८० मंदिरांचा जीर्णोद्धार, २८०० गावांमध्ये साप्ताहिक महाआरतीसह ते करीत असलेल्या कार्याविषयी तुकाराम महाराज यांनी माहिती दिली. शंकर महाराजांनीही संजय महाराज खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी असल्याचे सांगितले. 

सत्काराला उत्तर देताना संजय महाराज पाचपोर यांनी साडेसातशे वर्षांपासून वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे, याचे कारण या संप्रदायाचा पाया मजबूत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हा पुरस्कार वारकरी संप्रदायाच्या शिकवणुकीला व गुरुजनांना समर्पित करीत असल्याची भावनिक साद घातली. कार्यक्रमाला मराठा पाटील सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लांजूळकर, सचिव आशुतोष लांडे, कार्यकारी सदस्य सुधाकर शिंबरे, सुधाकर डुकरे, नाना टीकार, बी. डी. पाटील, डॉ. दीपक पाचपोर, प्रकाश पाटील माळी, पांडुरंग पाटील, वसंत पाटील मिरगे, श्याम पाटील आदितीउपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन आशुतोष लांडे  यांनी केले.











Post a Comment

أحدث أقدم