दुभाजकांवर बॅनर लावू नका.... रस्ता सुंदर ठेवा
वृक्ष संवर्धनाचा व सुरक्षेचा संदेश देण्याकरिता गणपती बाप्पां समोर डेकोरेशन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक खामगाव शहरातील "सुंदर माझा रस्ता" अभियानांतर्गत शहरातील दुभाजकावर फुल झाडे लावून वृक्ष संवर्धन करण्यात आले यामध्ये खामगावातील अनेक संघटनांनी सहभाग घेतला त्याचे संवर्धन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे तसेच दुभाजकावर ( डिव्हायडरवर ) बॅनर लावले जातात त्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतो व स्पर्धा निर्माण होते त्यामुळे कृपया डिव्हायडरवर बॅनर लावू नये हा बाप्पांचा मोलाचा संदेश आहे.सदर डेकोरेशन तरुणाई फाउंडेशन चे सचिव, राजेंद्र कोल्हे यांनी केली आहे.यापूर्वी शंकर नगर भागातील वीर हनुमान मंडळासाठी त्यांनी अनेक वर्षे अनेक समाज उपयोगी व सामाजिक संदेश देणारे देखावे तयार केलेले आहेत.पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून सामाजिक देखाव्याबद्दल राजेंद्र कोल्हे यांना अनेक वेळा सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे.
![]() |
गणेश मूर्ती ही शाळू मातीची असून ती सुद्धा हातानेच राजेंद्र कोल्हे यांनी बनवलेली आहे. श्री कोल्हे यांनी हे डेकोरेशन त्यांच्या सुटाळा स्थित घरात बसविलेल्या गणपती बाप्पा समोर तयार केलेले आहे. |
إرسال تعليق