लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चॅरीटेबल मेडीकल फाऊंडेशनचा उपक्रम

स्व.श्री.श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृती जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ जाहीर


खामगांव : सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणाऱ्या लॉयन्स क्लब खामगांव व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकराव्या जिल्हास्तरीय स्व. श्र.स. बावस्कर गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातून ग्रामीण, शहरी, अंध, अपंग व कर्णबधीर, सेवानिवृत्त, वरिष्ठ महाविद्यालय या गटामध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षक वृंदांनी प्रतिसाद देत सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी व्दारे प्रस्ताव पाठविले होते. ह्या प्राप्त प्रस्तावांचे मुल्यमापन करुन खालील प्रमाणे पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नांवे गटनिहाय जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्काराचे वितरण बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल, नांदुरा रोड, खामगांव येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक ग्रामीण विभागातून श्री. गणेश नामदेव सातव, सहा. अध्यापक (जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळा. काजेगांव, ता. जळगांव जा.), प्राथमिक शहरी विभागातून सौ. संगिता जितेंद्रसिह चव्हाण, सहा. अध्यापक (श्री. पाई हायस्कूल, जलंब, ता. शेगांव), माध्यमिक शहरी विभागातून श्री. शरद दिगंबर देशपांडे, सहा. अध्यापक (श्री लिलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर), माध्यमिक ग्रामीण विभागातून श्री. काशिराम सखाराम बोरे, सहा. शिक्षक (श्री संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा), अंध, अपंग, कर्णबधीर व आदिवासी विभागातून श्री. दिपक मुरलीधर उमाळे, सहा. अध्यापक (जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन, ता. जळगांव जा.), सेवानृिवत्त विभागातून सेवानिवृत्तीनंतरही सदैव कार्य करणारे श्री. रामेश्वर रामचंद्र कापडे, सेवानिवृत्त उच्च श्रेणी शिक्षक (जि.प. मराठी उद्य प्राथमिक शाळा भंडारी, ता. खामगांव), तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक विभागातून प्रा. हरिदास प्रतापसिंग सोळंके, वरीष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक (श्री.ग.भी. मुरारका कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरणाचा सोहळा बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १.०० वा. लॉयन्स आय हॉस्पीटल सभागृह, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे मान्यवर व लॉयन्स पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकवृंदांना वैयक्तिकरित्या तसे कळविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांनी सपत्नीक उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लब खामगांचे अध्यक्ष लॉ. शंकर परदेशी, सचिव लॉ. डॉ. धंनजय तळवणकर, कोषाध्यक्ष लॉ. राहुल भट्टड व धंन्वतरी चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर यांनी केले आहे असे लॉयन्स क्लब खामगांवचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रका द्वारे कळवले आहे.



Post a Comment

أحدث أقدم