अपघात नव्हे खून...

अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा जिल्हा व सत्र न्यायाधीश सरोज माने गाडेकर यांनी केला निर्वाळा

आरोपीस ७ वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा व  ५५ हजार रुपये दंड

हिंगोली जनोपचार न्यूज नेटवर्क:- दुचाकी ला टिप्परची धडक देऊन अपघात घडवून खून केल्याच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश सरोज माने गाडेकर यांनी दिला आहे. पुरावे साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्यानंतर आरोपीला सात वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा तसेच पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 

याबाबत असे की, हिंगोली जिल्हयातील मौजे बढकळी ता. सेनगांव जि. हिंगोली येथील फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती की, फिर्यादी व त्यांचे भाउ व वडील यांच्या सोबत अरोपी शिवाजी किशन संत व तयाचे वडील व मयत भाऊ सुरेश यांचे बटकाळी येथे शेतीच्या नालीच्या वादावरून सन २०१७ रोजी भांडण झाले होते. व त्यांचे एकमेकांच्या विरुध्द गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर अरोपीचा भाऊ सुरेश हा भांडणाच्या १८ महिन्यानंतर हार्ट अॅटकने मरण पावला होता त्याच्या मरणाच्या संशयावरून अरोपी हा नेहमी फिर्यादीस शिवीगाळ करित होता. व जिवे मारण्याची धमकी देत होता.


दि. ११.०५.२०१९ रोजी फिर्यादी व त्याचे दोन भाउ हे त्यांच्या बहिणीचे लग्नाच्या पत्रीका वाटण्यासाठी दोन मोटार सायकलवर सेनगाव येथे जात असतांना दु. ११.३० वा.अरोपी नामे शिवाजी किशन संत रा.वटकळी ता. सेनगाव जि. हिंगोली याने त्याच्या ताब्यातील हायवा टिप्पर या वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून धडक मारून सुभाष अर्जुन देवकर याचा खुन केला व यलप्पा


अर्जुन देवकर याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. अशा अशयाच्या फिर्यादी वरून पो.स्टे. सेनगांव येथे गु.रं.नं ७३/२०१७ कलम


३०२,३०७,४२७ भादवी अन्वये अरोपी विरूध्द गुन्हा नोदवुन सदर गुन्हयाचा तपास सरदारसिंग ठाकुर पोलीस निरिक्षक पो.स्टे. सेनगावे यांनी केला. पस्तुत प्रकरणात मा. न्यायालयात सत्र खटला क. ११४/२०१९ देण्यात आला.


सदर प्रकरण हे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने गाडेकर यांचे समोर चालले सदर प्रकरणात सहा सरकारी वकील श्री एस.डी. कुटे यांनी एकुण ११ साक्षीदार तपासले व अंतिम युक्तीवाद केला. यामध्ये मा. न्यायालयात फिर्यादी व ईतर साक्षीदार यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली असुन मा.जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.एस.एन. माने गाडेकर हिंगोली. यांनी आज दि.२३.०९.२०२४ रोजी सत्र खटला क.११४/२०१९ सरकार वि.शिवाजी संत या प्रकरणात अरोपी शिवाजी किशन संत यास कलम ३०४ भाग (ii) भादवी अन्वये दोषी ठरवुन ०७ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रक्कम २५.०००/हजार रूपये दंडांची शिक्षा व दंड न भरल्यास १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व कलम ४२७ भादवी अन्वये रक्कम ३०,०००/- हजार रूपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर दंडाची रक्कम हि फिर्यादीस त्याच्या मोटार सायकलचे झालेले नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीस देण्यात यावे. असे न्यायनिर्णयात आदेश पारित करण्यात आले.


उपरोक्त प्रकरणात सरकार पक्षातर्फे श्री एस.डी. कुटे सरकारी वकील, हिंगोली यांनी बाजू मांडली व त्यांना श्री. श्री एन एस मुटकुळे व श्रीमती सविता एस. देशमुख सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला.

Post a Comment

أحدث أقدم