महा भयानक......
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-खामगाव शेगाव जाणाऱ्या मार्गावरील जयपुर लांडे पुलाजवळ एका तीस ते पस्तीस वर्षीय वयोगटातील महिलेचा विचित्र अपघात झाल्याची वार्ता समोर आली आहे. या महिलेच्या अंगावरून अनेक वाहने गेल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे. अक्षरचा चेंदामेंदा झालेल्या मृतदेहाला विच्छेदनगृहात पाठवण्यात आले आहे. आज रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली असून अद्याप या महिलेची ओळख पटली नाही.पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले असून वृत्तलेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.
إرسال تعليق