खामगांव तालुक्यात क्लेम न केलेल्या शेतकर्यांना सरसकट विमा मिळावा याकरिता प्रहारच्या वतिने निवेदन
खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- तालुक्यात 2023 या वर्षी मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते या मध्ये कपाशी,सोयाबिन,तुर,उळीद, अश्या विविध पिकाचा समावेश आहे,अनेक शेतकर्यांनी जुलै 2023 या महिन्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा काढला आहे तसेच शेलोडी,गावातील काही शेतकर्यांनी तर कपाशीचा एकही वेचा न काढता कपाशी उपटावी लागली त्यांचा शेलोडी तलाठी बाठे साहेब यानी पंचनामा सुद्धा केला तरी शेतकर्यांना काहीच मिळाले नाही परंतु नुकसान झाल्यानंतर त्या क्लेम सबंधीची पुढील कार्यवाहीची माहिती शेतकर्यांना नसल्याने नुकसान भरपाई पासुन वंचित राहत आहे काही शेतकरी असे आहेत त्यांच्याजवळ मोबाईल सुद्धा नाही दोन तिन लोकांनी 72तासाच्या आत क्लेम केली तर त्यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम जमा झाली तरी लवकरात लवकर सरसकट विमा मिळावा या करिता प्रहार ने तहशिलदार साहेब सुनिल पाटिल,व तालुका क्रुषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले जर या निवेदनाची दखल नाही घेतली तर प्रहार जनशक्ती पक्ष तिव्र असे आंदोलन करणार .या निवेदनाकरिता राम बोरसे प्रहार तालुका प्रमुख ,भगवानशिंग पवार,माजी सरपंच विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष शेलोडी ज्ञानदेव मामनकार,भगिरथ पेसोडे, शेख रफिक शेख राजिक,रविंद्र बाणाईत,सुनिल कौलकार,एकनाथ गाड़े,श्रीक्रुष्ण मामनकार,अभि खोंड आणि शेतकर्याचा सह्या आहेत.
إرسال تعليق