झोन सदस्य अभिमुखता कार्यक्रम संपन्न


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बालाजी फार्म हाऊस येथे ३१ ऑगष्ट रोजी झोन सदस्य अभिमुखता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात लायन्स क्लब परिवारातील १० नविन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. हे नविन सदस्य संदीप पंडा, संतोषी पंडा, आशिष मोदी, सुरभी मोदी, स्नेहल गोयनका, सुरभी गोयनका, विक्की सावकार, पंकज सावकार, सरला सावकार आणि शुभांगी सावकार हे असुन लायन्स क्लबचा समृध्द इतिहास व आपला क्लब आपला रस्ता चे मार्गदर्शक सिध्दांत इत्यादी बाब माहिती देण्यात आली.


या कार्यक्रमात प्रमुख म्हणून क्षेत्र अध्यक्ष एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल उपस्थित होते. त्यांनी प्रेरणादायी शब्दांनी सभासदांना प्रोत्साहन दिले आणि लॉयन्स क्लबची समाजातील भुमिका आणि समाजसेवेचे महत्व सांगितले.

झोन अध्यक्ष एमजेएफ लॉ. उज्वल गोयनका यांनी सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. एमजेएफ लॉ. नरेश चोपडा यांचे द्वारे आयोजीत एक मनोरंजक लॉयन प्रश्नमंजुषा देखील या कार्यक्रमाचा एक भाग होता ज्यामध्ये विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली आणि या कार्यक्रमात शिक्षण आणि मनोरंजनाचा एक अनोखा मिलाफ जोडला गेला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लॉ. संजय उमरकर यांनी केले तर लॉ. भारती गोयनका यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी ६० लॉयन्स सदस्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि कार्यक्रमानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला, ज्यामुळे क्लबमध्ये एकता आणि एकोपा वाढला. उपरोक्त माहिती क्लबचे मार्केटींग कम्युनिकेशन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका यांनी दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم