छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडलेल्या घटनेचा मराठा पाटील सेवा मंडळाच्या वतीने निषेध व निवेदन

खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडलेल्या घटनेचा मराठा पाटील सेवा मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्णदेशाचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवराय हे  सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अरिगतेचा विषय आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महारांजाचा सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर ८ महिन्यापुर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही बाब अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्रच्या अस्मितेला डाग लावणारी बाब  आहे. हा फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजंच्या गौरवशाली कर्तृत्ववान इतिहासाचा सुध्दा घोर अपमान आहे. निवेदनात पुढे नमूद आहे की, ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेवून दोषीवर कठोर कारवाई करावी व भविष्यात असेही नमूद आहे . निवेदनावर मराठा पाटील सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर राव लांजुळकर , सचिव आशुतोष लांडे, ज्ञानदेवराव मानकर, श्याम पाटील सुधाकर पाटील नितेश मानकर, रामराव पाटील ,डॉक्टर उगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

أحدث أقدم