नवीन ठाणेदार पवार ग्राउंड वर...
नो पार्किंग मधील दुचाकींवर कारवाया तर दुकानदारांनाही दिल्या सूचना
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- शहरातील विविध भागात बेशिस्त पार्किंग होत असल्याने नव्याने रुजू झालेले ठाणेदार आर एन पवार यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला त्यामुळे आता बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांची खैर नसून या कारवाया सुरू राहणार आहेत.
स्थानिक सरकी लाईन मेन रोड शाळा क्रमांक सहा समोर व नांदुरा रोडवर बेस्ट दुचाकी उभी करणाऱ्यांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली सुमारे 35 वाहनांवर इ चलन करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ठाणेदार पवार यांनी जनोपचार शी बोलताना म्हटले की नागरिकांनी आपले वाहन पार्किंग करताना अडथळा होऊ नये याची दक्षता घ्यावी दुकान मालकांनीही आपले फ्लेक्स, बोर्ड रस्त्यात ठेवू नये असे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
إرسال تعليق