शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मुलाखतीचे आयोजन
![]() |
अधिक माहितीकरिता संस्थेचे संकेतस्थळ www.gpk.edu.in यावर भेट द्यावी. |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी,अणूविद्युत अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी व कर्मशाळा या विभागांचा समावेश आहे. या पदांकरिता शैक्षणिक अहर्ता संबंधित शाखेतील मान्यता प्राप्त संस्थेची पदविका अथवा आय.टी.आय. अशी असून याकरिता सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी शासकीय तंत्रनिकेतन खामगांव येथे सकाळी ११.३० वाजता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरिता उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही प्रशिक्षणार्थी योजनेचा (अप्रेंटिस) लाभ घेतलेला नसावा व कोठेही अन्यत्र शिक्षण किंवा प्रशिक्षण सुरू नसावे. उमेदवारांकरिता वयोमर्यादा १८ ते ३५ अशी असून उमेदवाराने www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेत स्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत किमान वेतन कायदा, कामगार भविष्य निधी कायदा, औद्योगिक नुकसान भरपाई व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. तसेच सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महीने असून त्यानंतर सदर प्रशिक्षण योजना संपुष्टात येईल. याकरिता दरमहा ८ हजार रुपये विद्यावेतन महाडीबीटी मार्फत उमेदवारांच्या खात्यात जमा होईल. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी केलेले आहे. अधिक माहितीकरिता संस्थेचे संकेतस्थळ www.gpk.edu.in यावर भेट द्यावी.
إرسال تعليق