खामगाव शहर पोलिसांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- वारंवार घडत असलेले गुन्हे व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराला लक्षात घेऊन खामगाव शहर पोलिसांनी शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पो उप नि. सदार मॅडम यांनी विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना गुड टच व बॅड टच  संदर्भात व पोक्सो कायदा बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.शाळेतील प्राचार्य, शिक्षक वृंद, शिक्षकेतर स्टाफ, वाहन चालक यांना विद्यार्थ्यांची घ्यावयाची खबरदारीव काळजी याबाबत योग्य  त्या सूचना दिल्या.बदलापूर मुंबई सारखी घटना घडू नये याबाबत मार्गदर्शन केले.  शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना गोपनीय तक्रार करता यावी याकरिता शाळेत तक्रार पेटी  ठेवण्यात आल्या आहेत.पोलीस मदती करिता 112 नंबर वर संपर्क करण्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.शाळा कॉलेज परिसरात cctv बसवणे व  cctv कॅमेरे चालू करणे व फुटेज सेव्ह होत असल्याचे खात्री करणे बाबत सूचना दिल्या. शाळेत शाळेच्या विद्यार्थी व्यतिरिक्त इतर व्यक्ती आल्यास त्याची चौकशी करावी.

संशयित वाटल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती देणे.शाळेतील बाहेर गावाचे विद्यार्थ्यांना ने आण करणारे चालक तसेच गाड्यांमधील इतर कर्मचारी तसेच शाळेतील सफाई कर्मचारी यांचे चरित्र पडताळणी अहवाल बनवून घेण्या बाबत सूचना दिल्या. बालक (मुलगा/मुलगी) सोबत एखादी चुकीची घटना घडल्यास किवा एखादा व्यक्ती वारंवार आपल्याशी नको असलेली जवळीक करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याची माहिती पोलीसांना द्यावी याबाबत सूचना दिल्या. स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनाधीनता चे दुष्परिणाम बाबत कळविले. अशा प्रकारचे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थीनी , शिक्षक, व इतर स्टाफ यांना करण्यात आले.सदर कार्यक्रमला विद्यार्थिनी हजर होते.

Post a Comment

أحدث أقدم