रोटरी वर्ष २०२३-२४ करीता रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० च्या अवार्डसचा भव्य सोहळा संपन्न

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-रोटरी ही एक सेवाभावी संस्था असून संपूर्ण जगभरात २०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० हा विभाग संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील १६ जिल्हे मिळून बनलेला आहे आणि यामध्ये १०२ रोटरी क्लब्ज कार्यरत आहेत. दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणा-या रोटरी क्लब आणि व्यक्तींना अवार्ड देऊन सन्मानित केल्या जाते.

यावर्षी हा सोहळा जळगाव खानदेश येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे मागील रविवारी आयोजित करण्यात आला होता.  विद्यमान प्रांतपाल राजिंदरसिंग खुराणा, निवर्तमान प्रांतपाल आशा वेणुगोपाल, माजी प्रांतपाल किशोरजी केडिया, राजीव शर्मा, डॉ आनंद झुन्झुनुवाला, महेश मोकलकर व इतर अनेक गणमान्य प्रभूतींची उपस्थिती होती. रोटरी क्लब खामगांवने यावेळेस क्लब व व्यक्तिगत स्तरावर अनेक पदकांची लयलूट केली.क्लब स्तरावर उत्कृष्ट साक्षरता अभियान, युवकांसाठी उत्कृष्ट कार्य, पर्यावरण जागरूकता, वसुंधरा बचाव मोहीम, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, इतरांपासून वेगळेपण जपणारे प्रोजेक्ट आणि आखून दिलेले सर्व उद्दिष्ट पुर्तीनिमित्य क्लब सायटेशन अवार्ड याप्रमाणे सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. व्यक्तिगत स्तरावर सहायक प्रांतपाल पदाची जिम्मेदारी उत्कृष्टपणे वहन केल्याबद्दल सुनील नवघरे, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० स्तरावर उत्कृष्ट ग्रीटींग चेअरमन म्हणून कार्य केल्याबद्दल रितेश अग्रवाल, अवार्ड समितीमध्ये सर्व १०२ क्लब्जचे नि:पक्षपातीपणे मुल्यांकन केल्याबद्दल माजी प्रांतपाल डॉ आनंद झुन्झुनुवाला, उत्कृष्ट क्लब सचिव म्हणून आनंद शर्मा आणि सर्व सर्व्हिस प्रोजेक्टस दरम्यान सर्वोतपरी सहायता केल्याबद्दल राजीव नथानी या सर्वांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.


याप्रसंगी रोटरी वर्ष २०२३-२४ चे अध्यक्ष सुरेश पारीक व मानद सचिव आनंद शर्मा यांनी त्यांचे योग्य मुल्यांकन केल्याबद्दल रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० स्तरावरील सर्व पदाधिका-यांचे व वर्षभर उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लब खामगांव परिवारातील सर्व सदस्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केलेले आहेत. केलेल्या कार्यांची दाखल घेऊन इतके सारे अवार्डस मिळविल्याबद्दल शहर परिसरातून मागील वर्षीच्या चमूची सर्वत्र वाहवा होत आहे. यावर्षीदेखील सेवाकार्यांची ही परंपरा अशीच जोपासण्यात येईल अशी ग्वाही यावेळेस विद्यमान अध्यक्ष विजय पटेल व मानद सचिव किशन मोहता यांनी दिलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم