उद्या खामगावात हौशी गायकांचा रंगारंग कार्यक्रम
🎧एक शाम किशोर दा के नाम🎤
खामगाव प्रतिनिधी:-सुप्रसिद्ध गायक स्वर्गीय किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त खामगाव शहरातील हौशी गायकांचा रंगारंग कार्यक्रम उद्या 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. स्थानिक हॉटेल तुळजाई मध्ये दुपारी 4 ते 9 वाजेपर्यंत हा रंगारंग कार्यक्रम धुमसणार आहे. एकापेक्षा एक गायक किशोर कुमार यांच्या वेगवेगळे गीत सादर करणार आहेत. रंगारंग कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या श्रोत्यांना अगदी निशुल्क आनंद घेता येणार असून जास्तीत जास्त श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कराओके सिंगर्स क्लब खामगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
إرسال تعليق