रस्त्यावरील खड्डे करत आहेत भ्रष्टाचाराचे(?) पितळ उघडे! 

आज रात्री आठ वाजता काढलेले छायाचित्र

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहरातील रस्ते जणूकाही खड्ड्यांचा जंगल बनलं असून हे रस्ते आता भ्रष्टाचाराचे(?)पितळ उघडे पाळत असल्याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे. शहरातील मेन रोड वगळता इतरत्र सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. बहुतांश ठिकाणी खड्डे वाचविताना वाहनावरील नियंत्रण सुटून किरकोळ अपघातही होत आहेत. या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रस्ते बनविताना तपासणी व्यवस्थित होत नाही का की "मलिदा"लाटून रस्ते बनवल्यानंतर बीले काढण्यात येतात ,असाही सवाल आता चर्चिल्या जात आहे. शहरातील नॅशनल हायस्कूल, एकबोटे चौक, आईसाहेब मंगल कार्यालय, भगतसिंग चौक ,फरशी, नटराज गार्डन समोर, अग्रसेन चौक ,परिवार ड्रेसेस ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,पर्यंतचा रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. याकडे आमदार आकाश फुंडकर यांनी लक्ष देऊन विशेष निधीचा वापर करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم