जेसीआय खामगाव जय अंबे द्वारा आयोजित श्रावणोत्सव 03 उत्साहात संपन्न 

  खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- शहरात अनेक प्रकारच्यासमाजिकाआयोजनाकरिता प्रसिद्ध जेसीआय खामगाव जय अंबे तर्फे या वर्षी सुद्धा श्रावणोत्सव 03 चे आयोजन अग्रसेन भवन बालाजी प्लॉट येथे मागील रविवारी करण्यात आले होते. रिमझिम श्रावण सरी दिवसभर सुरु असतानाही नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत या श्रावणोत्सव 03 ला यशस्वी केले.

सर्व प्रथम मोठी देवी माँ जगदंबा चरणी प्रार्थना करत जेसीआई इंडिया चे झोन 13 चे उपाध्यक्ष   जेसी गौरव डाकराव यांच्या हस्ते फीत कापून या श्रावणोत्सव चे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांचा पुष्पगुछ व स्मुर्तीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या श्रावणोत्सव मधे खामगाव शहरा व्यतिरिक्त अकोला व बुलढाणा येथील घरघुती व्यावसायिकानी त्यांचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे, ज्वेलरी, पर्स, आभूषण, मसाज, पार्लर आयटम, पूजेचे साहित्य, महिलांसाठी आकर्षक साडी, ड्रेस, लहान मुलांसाठी खेळणे, अभ्यास उपयोगी साहित्य अशा इतर अनेक वस्तूंची आरासच मांडली होती. या सर्व स्टॉलवर शहरातील नागरिकांनी भेट देत मनसोक्त खरेदी केली व विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. यासोबतच जेसीआय खामगाव जय अंबे तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते ज्यामध्ये प्रामुख्याने सेल्फ मेकअप फॉर किड्स, हेल्दी बेबी कॉन्टेस्ट, छाता डेकोरेशन, दिमाग की बत्ती जलाओ, कलरिंग कॉम्पिटिशन, सोलो डान्स कॉन्टेस्ट, ग्रुप डान्स कॉन्टेस्ट, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होते. या सर्व स्पर्धांमध्ये लहान मुलांनी उत्साहात सहभाग नोंदवला या  स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना संस्थेतर्फे विविध प्रकारची बक्षिसेत व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता  संस्थेच्या वतीने प्रणेते डॉ भगतसिंग राजपूत, अध्यक्ष डॉ गौरव गोयनका, सचिव ऍड दिनेश वाधवानी, पूर्वाध्यक्ष डॉ शालिनी राजपूत,पूर्वाध्यक्ष ऍड रितेश निगम, पूर्वाध्यक्ष कौस्तुभ मोहता, प्रकल्पप्रमुख सौ देवांशी मोहता, सहप्रकल्प प्रमुख सौ पूनम घवाळकर, डॉ चेताश्री शंकरवार, डॉ श्रुति लड्ढा, सौ सोनल टिंबाडिया, सौ रश्मी जैसवाल, सौ नम्रता लाटे, सौ रचना सलुजा, सौ प्रीती देशपांडे, सौ सुरभी गोयनका, सौ सुरभी मोदी,सौ मोना खत्री,सौ निष्ठा पुरवार, शार्वी अग्रवाल, योगेश खत्री, रोहन जैसवाल,  अपूर्व देशपांडे, डॉ अनुप शंकरवार, डॉ गौरव लढढा, आशिष मोदी, डॉ आनंद राठी, करण डिडवानिया, मंगेश राऊत, श्रेणिक टिम्बडिया, सुशांतराज घवाळकर, विशाल गांधी सहित जेसीआई खामगाव जय अंबेच्या सर्व  सदस्यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

أحدث أقدم