अभावीपच्या अभियानाला हास्य मंडळाची भरघोस साथ 


खामगाव (जनोपचार)-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत अंतर्गत विकासार्थ विद्यार्थी द्वारा दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान एक झाड एक विद्यार्थी हे अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा खामगाव च्या वतीने एक झाड एक विद्यार्थी हे अभियान राबविण्यात येत आहे.स्थानिक हास्य मंडळ च्या वतीने खामगाव नगरात जवळपास एक लाख झाड लावण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. आमच्या या अभियानाला अभाविप ने दिलेल्या प्रतिसादा बद्दल अभाविप च्या पदाधिकाऱ्यांचे हास्य मंडळाच्या अभियानाचे प्रमुख गोपाल चौधरी यांनी कौतुक केले.या प्रसंगी विद्यार्थी परिषदेच्या मोहिमेला हास्यमंडळाने जवळपास प्रत्येक शाखेत साठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वृक्ष उपलब्ध करून दिले. त्या बद्दल अभाविप च्या वतीने हास्य मंडळाचे गोपाल चौधरी,दिपक बजाज, दलजीत सिंग, विनोद चौधरी,योगेश सुरेका यांंचा सत्कार अभाविप चे जिल्हा प्रमुख गणेश घोराळे, जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे,जिल्हा संघटन मंत्री महेश वाघमारे,नगर मंञी गणेश कठाळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी एस.एफ.एस. प्रमुख शुभम राठोड, एस.एफ.डी.प्रमुख अभिजित देशमुख,सहमंञी आनंद निकाळजे,कार्तिक नेमाने,जनजाती प्रमुख दिपक राऊत,महेश जाधव, प्रथमेश कोहळे,प्रेम करवते अनिकेत वरूडकर,पंकज भोपळे, प्रकाश शर्मा, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم